आपटी येथील महाविद्यालय इमारतीच्या नूतनीकरणासाठी ‘चोरडिया उद्योग समूहा’चे सर्वेसर्वा राजकुमारजी चोरडिया यांच्यावतीने पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त
भोर : भोर एज्युकेशन सोसायटीच्या आपटी(ता. भोर) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इमारतीच्या नूतनीकरणासाठी “प्रविण मसालेवाले” तसेच चोरडिया उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राजकुमारजी चोरडिया यांच्यावतीने पाच लाख रुपयांचा धनादेश भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, संचालक शशिकांत कंक, मुख्याधापिका घोडके मॅडम, वीर सर आणि उपसरपंच अविनाश गायकवाड यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड, पुणे येथील चोरडिया उद्योग समूहाच्या कार्यालयात सुपूर्त करण्यात आला.
जैन सकल संघ अध्यक्ष व कोठारी उद्योग समुहाचे उद्योजक विजयकांतजी कोठारी यांच्या विशेष सहकार्यातून तसेच भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष व ग्रामपंचायत आपटी उपसरपंच अविनाश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यालयासाठी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.