भोर तालुका वनखाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अतिदुर्गम सांगवी वे.खो. येथील शाळेत शालेय साहित्याचे वाटप
भोर : भोर तालुका वनखाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त भोर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सांगवी वे.खो.(ता. भोर) शाळेत एन. आर. प्रवीण (भा.व.से.) मुख्य वनसंरक्षक यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक(प्रा) भोर शितल राठोड, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगुटे, शिवाजी राऊत, संग्राम जाधव तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष शाम भोकरे, सचिव लक्ष्मण शिंदे, संचालक अरुण डाळ, पंडित गायकवाड, नवनाथ पगडे, पांडुरंग गुट्टे, शाळेचे मुख्याध्यापक पोपट धानवले, सांगवी गावाचे सरपंच राजेश रांजणे, जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव लक्ष्मण शिंदे यांनी पतसंस्थेची पंचविस वर्षातील वाटचाल सांगितली. दरवर्षी या संस्थेकडूनअतिदुर्गम भागातील मुलांना शालेय साहित्येचे वाटप करण्यात येते, तसेच वृक्ष लागवड व संस्थेच्या सभासदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो अशी विधायक कामे संस्थेकडून करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांकडून उपस्थित अधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात सांगवी गावातील पहिली ते सातवीमधील सर्व विद्यार्थ्यांना एकूण ३५ गणवेश, पाण्याची बाटली व बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच गणेश मानकर यांनी “गाव तेथे रुद्राक्ष” या योजनेअंतर्गत शाळेच्या पटांगणात रुद्राक्षाचे रोप मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. यावेळी सांगवी गावचे सरपंच राजेश रांजणे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून संस्थेच्या संचालकांचे उपस्थित सर्व वन अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.