केंजळ जिल्हा परिषद शाळा अतिउत्कृष्ट – शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

किकवी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ(ता.भोर) ही शिक्षण क्षेत्रांत आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रेरणादायी व आदर्श असून येथील वैविध्यपूर्ण उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासामध्ये भर घालत आहेत. तसेच केंजळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अति उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले.

बुधवारी(दि. ७ ऑगस्ट) आयुक्त सुरज मांढरे यांनी जिल्हा परिषद शाळा केंजळला भेट दिली. जवळपास दोन तासाच्या या भेटीदरम्यान शाळेतील सुविधा, लोकवर्गणी व शासन निधीचा वापर या शाळेने उत्तम  करून उत्तम दर्जाच्या उपलब्ध केलेल्या दिसून येतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने स्काऊट गाईड कॅम्प, कला क्रीडा विषयक तासिका, आनंददायी शनिवार या सर्व बाबींचा फार प्रभावीपणे वापर केंजळ शाळेतील शिक्षक करीत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद त्यांनी साधला. बहुतांशी सर्वच बाबतीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळचे विद्यार्थी पारंगत असल्याचे आयुक्त सुरज मांढरे यांनी यावेळी सांगितले. यादरम्यान त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर मुलांचे अभिप्राय, जीवनकौशल्यावर आधारित दैनंदिन जीवनातील व्यवहारातील विविध प्रश्न, त्यांची सोडवणूक कशी कराल या संदर्भात मुलांशी बराच वेळ मनमोकळी चर्चा व मार्गदर्शन त्याचप्रमाणे विविध उपक्रम पाहणी केली. तसेच या दिवशी त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळू व शिंदेवाडी येथे देखील भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.

Advertisement

कला क्रीडा अवांतर वाचन या बाबींनाही नियमित शिक्षणासोबत ही शाळा महत्त्व देत असल्याचे आयुक्त मांढरे यांना दिसून आले. एकंदरीत शाळेचे कामकाज अति उत्कृष्ट असल्याचे शेरा आयुक्त सुरज मांढरे यांनी जिल्हा परिषद शाळा केंजळ यांना दिला. याप्रसंगी भोर पंचायत समितीचे राजकुमार बामणे, सारोळा केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे यांच्या हस्ते आयुक्त सुरज मांढरे व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांना पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक जे.के. पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page