भोर नगरपालिका प्रशासना विरोधात जनआक्रोश मोर्चा… हजारोंच्या संख्येने युवकांपासून-ज्येष्ठांची उपस्थिती…

भोर न्यूज : भोर नगरपालिका प्रशासना विरोधात आज गुरुवार (दि. १२) रोजी निघालेल्या विराट मोर्चात बहुसंख्य भोरवासी सामील झाले होते. भोर एस.टी.स्टँड ते नगरपालिका कार्यालया पर्यंत हलगी, ताशा,तुतारी वाजवत नगरपालिका प्रशासना विरुद्ध घोषणा देत काळे झेंडे दाखवत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मध्ये सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष,माजी नगरसेवक, भोर शहरातील सर्व व्यापारी, सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,पेन्शन धारक, महिला, युवक व मुख्यतः सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते. प्रशासनाने घरपट्टी कर कमी करावा हा या मोर्चा मागचा मुख्य उद्देश होता.भोर शहराचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख मुद्दे उपस्थित केले. त्यामधे ते बोलले की हितून मागे नगरपालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला की आम्ही भोरकर त्यास सहमती दर्शवत असू , आता हीतून पुढे तसे होऊन देणार नाही.तसेच त्यांनी भोरवसियांना गुरुवार (दि.१९) गुरुवार पर्यंत नगरपालिका प्रशासनाच्या घरपट्टी कराबाबत हरकती देण्याचे आवाहन केले आहे. जर ५० टक्के पेक्षा जनतेने हरकती नोंदवल्या तर नगरपालिका प्रशासन जास्त घरपट्टी कर आकारू शकत नाही. आणि ५० टक्के पेक्षा कमी जनतेने हरकती नोंदवून काहीच उपयोग होणार नाही. व त्यामुळे घरपट्टी कर कमी करता येणार नाही. मग त्यावर सुप्रीम कोर्टात ही अपील करून पाहिजे तसा निकाल लागणार नाही.असे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सांगितले. तसेच शिवसेना(ठाकरे गट)पुणे जिल्हा संघटक कुलदीप तात्या कोंडे, आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कुलकर्णी यांनी भाषणा द्वारे नगरपालिका प्रशासनावर ताशेरे ओढले. तसेच भोर शहर भाजप चे अध्यक्ष सचिन मांडके यांनी असे सांगितले की नगरपालिका प्रशासनाच्या करवाढी विरोधात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला असता भोर वासियांना भेटण्यासाठी त्यांनी पुढच्या आठड्यातील वेळ दिला आहे. महिलांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.या मोर्चा मध्ये मुख्यतः माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, शिवसेना(ठाकरे गट)पुणे जिल्हा संघटक कुलदीप तात्या कोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, भोर तालुका भाजप अध्यक्ष जीवनआप्पा कोंडे ,उस्मणभाई शेख, समीर घोडेकर सकल मराठा समाजाचे संजू भेलके,कुणाल धुमाळ,आप्पा सोनवले,पार्थ रावळ,सुरेश साळुंके,शशिकांत वाघ, अनिल पवार,संतोष शेटे आणि महिलांमध्ये मुख्यतः सीमा तनपुरे,स्वाती ताई गांधी,दिपालिताई शेटे,पल्लवी फडणीस व भोर शहरांमधील असंख्य युवक,ज्येष्ठ, महिला उपस्थित होते. मोर्चा शांततेत पार पडला. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोर पोलीस निरीक्षक शंकर पाटील, राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page