भोर विधानसभेत महायुतीचा उमेदवार अखेर ठरला; “शंकर मांडेकरां”च्या नावावर शिक्कामोर्तब
भोर : विधानसभा निवडणुकीसाठी भोर मतदारसंघातून महायुतीकडून गेली अनेक दिवस उमेदवार गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. यामुळे उमेदवार नक्की कोण होणार? महायुतीत भोरची जागा कोणत्या पक्षाला मिळणार? याबाबत भोर-राजगड-मुळशीतील जनतेची उत्सुकता शिगेला लागली होती. आता याबाबत महायुतीकडून भोर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली आहे. शंकर मांडेकरांच्या नावावर शिक्कमोर्तब झाला असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भोर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी गुरुवारी(दि.२४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे आता भोर विधानसभेत महाविकास आघाडी व महायुती यामध्ये आ. संग्राम थोपटे व शंकर मांडेकर यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.