कर्तव्य दक्ष पोलिसांची काळजी गरजेची यामुळे हरजीवन हॉस्पिटल भोर यांसकडून कर्तव्यदक्ष पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी…
भोर : कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना, गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, व्हीआयपींचे दौरे, गस्त, सण, नवीन वर्षाचा जल्लोष यामुळे पोलिस समाजाचे रक्षण करण्यासाठी २४ तास कर्तव्य निभावत असतात. या कारणाने त्यांना आरोग्याची काळजी घेता येत नाही.सण,उत्सव असो किंवा इतर काही कार्यक्रम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पोलिस कर्तव्य बजावत असतात. नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्याने हरजीवन हॉस्पिटलमध्ये भोर, राजगड आणि सासवड पोलीस स्टेशनच्या सर्व पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलिस ठाण्यातील सुमारे 50 पोलिसांनी या वेळी आरोग्य तपासणी करून घेतली.या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस निरीक्षक शंकर पाटील साहेब यांच्या संकल्पनेनुसार डॉ अमित शेठ यांनी प्रत्येकी ७२०० रुपये किंमतीच्या सर्व तपासण्या या शिबीरामध्ये मोफत केल्या आहेत विशेष करून
X-Ray, ECG, 2D ECHO, ब्लडपप्रेशर तपासणी, तसेच रक्त लघवी तपासणी यामध्ये CBC ,RFT,BS- F /PP, HIV,HBSAG, LIPID PROFILE आणि एम,डी, मेडिसिन तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला,आहर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला , अस सगळ्या मोफ़त ठेवण्यात आले होते. त्यांच्या बरोबर डॉ.ओमकार थोपटे (कार्डीओलोजिस्ट), डॉ्.शुक्ला सर (सोनोग्राफी तज्ञ)यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याच बरोबर उपस्थीत सर्वांनसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.या शिबीरासाठी प्रामुख्यने उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड चे तानाजी बरडे,भोर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक शंकर पाटील, राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक आण्णासाहेब घोलप, भोर पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे तसेच इतर पोलीस कर्मचारी,महिला पोलीस कर्मचारी उपस्थित राहिले होते. तसेच हाॅस्पिटलचे डायरेक्टर डाॅ.उदय शेठ यांनी सर्वांचे स्वागत केले, तसेच मा.श्री. अमित शेठ यांनी मार्गदर्शन केले,तसेच हाॅस्पिटल मॅनेजर तुषार साळेकर,तन्मय कुंभार यांनी अभार मानले.