झुंजार मिञ मंडळ आयोजित “अक्षर शिल्प एक शब्द प्रवास” अंतर्गत भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
भोर : झुंजार मिञ मंडळ आयोजित “अक्षर शिल्प एक शब्द प्रवास” अंतर्गत भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. भोर येथील श्री वाघजाई देवी मंदिर सांस्कृतीक हॉल मध्ये गुरुवारी(दि.३ सप्टेंबर) ते शनिवार(दि.१२ सप्टेंबर) दरम्यान श्री वाघजाई देवी शारदीय नवरात्रौत्सव निमित्त या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष सुर्यकांत किंद्रे, पोलीस हवालदार हेमंत भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक यशवंत डाळ, नितीन धारणे, वास्तूतज्ञ अभिजित गायकवाड, झुंजार मिञ मंडळाचे अध्यक्ष मयुर भिसे, उमेश धारणे, चेतन जाधव, समीर घोणे, विनय पलंगे, सुनील थोपटे, मयुर बोडके व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या पुस्तक प्रदर्शनात श्रीमदभगवद्गीता, अग्निपंख, कथा, कादंबरी, ऐतिहासिक चरित्र, आत्मचरित्र, धार्मिक पाककला, पर्यटन, शालेय व्यक्तीमत्व विकास, मराठी व इंग्रजी बालवाडःमय भविष्य कविता, नाटक, संगीत तसेच नामवंत लेखकांची पुस्तके उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती मयुर भिसे यांनी दिली.