भारतीय जनता पार्टीच्या राजगड तालुका प्रमुखपदी राजूभाऊ रेणुसे; शिवरे येथील आढावा बैठकीत निवड
नसरापूर : भारतीय जनता पार्टी राजगड(वेल्हे) तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक आज शुक्रवारी(दि. ११ ऑक्टोबर) दुपारी दीड वाजता शिवरे(ता.भोर) येथील हॉटेल रामकृष्ण येथे पार पडली. या बैठकीमध्ये राजूभाऊ प्रभाकर रेणुसे यांची भारतीय जनता पार्टी राजगड(वेल्हे) तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते रेणुसे यांना निवडीचे हे पत्रक देण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याच्या वतीने माजी आमदार शरद ढमाले, भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, सरचिटणीस शेखर ओढणे, विस्तारक सुनील जागडे, राजगड प्रभारी वैशाली सणस, सचिव सुषमा जागडे, भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राजगड तालुक्यातील पक्ष संघटनेमध्ये महत्त्व पूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी तालुक्यातील रवी दसवडकर, दिनकर मळेकर, प्रशांत शिळीमकर, सचिन भरम, अविनाश भोसले, सुनील बोरगे, विठ्ठल गोरे, शुभम बेलदरे, रामभाऊ लिम्हण, रोहिदास करंजकर, अनिल दा, सतीश लिम्हाण, भाऊ मरगळे, रोहित शिळीमकर, मंगेश कुंभार, रवींद्र चोरघे, प्रसाद दसवडकर राम भरम, सुहास शेंडेकर, सुनील धिंडले, शांताराम मोहिते, विनोद आढावाडे, पवन शिंदे, श्रीकांत पवार, शिवाजी सोनवणे, तसेच महिला अध्यक्ष गौरी भरम, सुजाता कडू यांच्या उपस्थितीमध्ये या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.