भोर विधानसभेत पहिल्या दोन दिवशी माहोल शांत : अद्यापपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; आत्तापर्यंत १५ इच्छुक उमेदवारांनी नेले ३१ अर्ज
भोर : महाराष्ट्रात विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज विक्री व भरण्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी भोर विधानसभा मतदार संघासाठी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झाला नसून दोन्ही दिवस निरंक ठरले असल्याची माहिती भोर विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर केलेल्या तारखेप्रमाणे २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर यादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी भोर विधानसभा मतदार संघासाठी या तारखेतील मंगळवार(दि. २२ ऑक्टोबर) व आज बुधवार(दि. २३ ऑक्टोबर या दोन दिवसात अद्याप पर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसून मंगळवारी १० इच्छुक उमेदवारांनी १७ अर्ज तर आज बुधवारी ५ इच्छुक उमेदवारांनी १४ अर्ज नेले असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिली.