सहयोग फाउंडेशन पुणे कात्रज यांच्या सहयोगातून आज मोफत आरोग्य शिबीर
कात्रज :- सहयोग फाउंडेशन पुणे कात्रज यांच्या सहयोगातून नाभिक समाजासाठी इंदिरा एकादशी १० ऑक्टोबर निमित्त डॉक्टर अरविंद झेंडे (आयुर्वेदाचार्य व पंचकर्म योग तज्ञ) यांच्या मार्गदर्शना खाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे..
हे सदर उपक्रम मागील चार वर्षापासून नाभिक समाजातील बंधू-भगिनी माता अबालबुद्ध यांच्यासाठी प्रत्येक एकादशी ला घेत आहेत.
या उपक्रमांमध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून जीर्ण, जुना आजार यावर सर्वतोपरी उपचार केले जातात. अतिशय अल्प दरामध्ये तेही रुग्णाला त्या औषधाची महत्त्व मिळावं महत्त्व कळावं या उद्देशाने पैसे घेतले जातात. महिन्याच्या औषधांना फक्त आणि फक्त चारशे रुपये घेतले जातात यामध्ये कुठलीही कन्सल्टिंग फी तपासणी फी व अन्य आकारणी केली जात नाही पूर्वी हा उपक्रम पूर्ण पणे मोफत होता पण त्यामध्ये डॉक्टर अरविंद झेंडे सर न चा असे निदर्शनास आलं की लोक फक्त औषध घेऊन जातात औषध खात नाहीत, त्यामुळे रुग्णाला त्याची मिळालेले परिणाम कळत नाहीत, त्यामुळे त्यांनी हा उपक्रम अशा पद्धतीने चालू केला आहे. सर्व आजारांवर त्यांच्याकडे औषधोपचार आहेत. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर तर अतिशय गुणकारी आणि कार्य करणारी अशी औषध आहेत, डायबिटीस मुळे होणाऱ्या जखमांसाठी खूप छान पद्धतीची औषध आहेत तसेच अनेक प्रकारच्या विकारांवर औषध दिलीच जातात आणि हा सर्व उपक्रम हा प्रत्येक एकादशीला केला जातो तसेच इतर दिवशीही रुग्णाच्या गरजेप्रमाणे न्हावी समाजातील लोकांना हा आम्ही उपक्रम महिन्याच्या औषधांना फक्त चारशे रुपये या किमतीत दिला जातो. तसेच वाडीवस्ती महिलांच्या संघटना आरोग्य केंद्र महिलांचे योगाचे केंद्र अशा ठिकाणी जाऊन सहयोग फाउंडेशन महिलांना आरोग्य विषयक माहिती देते तसेच नाभिक समाजातील दुकानदारांच्या दुकानांमध्ये जाऊन त्यांना होणारे व्हेरिकोज व्हेन सारखे गंभीर आजार यावर सुद्धा माहिती देऊन उपचार करतात.
यामध्ये सहयोग फाउंडेशन टीम चे संस्थापक अध्यक्ष श्री भगवान शिंदे, अध्यक्षा
सौ बेबीताई क-हेकर, उपाध्यक्ष
डॉक्टर श्री अरविंद झेंडे, सचिव श्री दत्तात्रेय गोरे. खजिनदार श्री अरुण कालेकर,विश्वस्त श्री बाळकृष्ण भामरे, श्री मोहन क्षीरसागर,श्री रामदास सैंदाणे,सौ छायाताई गोरे, सौ शालन ताई पगारे. यांचे मोलाचे सहकार्य आहे.
आज होणाऱ्या उपक्रमांमध्ये डॉक्टर अरविंद झेंडे प्रत्येक रुग्णाचा
मोफत केस पेपर तयार करून सर्व तक्रारी लिहून घेतील.नाडी परीक्षण द्वारे रुग्णास आजार कशामुळे झाला आहे आजाराचे मूळ कारण सांगितील. औषध कशासाठी द्यायला हवे, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन करतील. नाडी परीक्षणाद्वारे औषधांची योजना करून गरजेप्रमाणे पंचकर्म व योगाबद्दल मार्गदर्शन करतील.
व किती महिने औषध घेणे गरजेचे आहे हे पण सांगतील.
यामध्ये खालील आजारांवर उपचार केले जातील स्त्रियांचे आजार, सुदृढ व निरोगी संतती प्राप्तीसाठी गर्भिणीपरिचर्या,मासिक पाळीच्या तक्रारी, केसांच्या तक्रारी,वंध्यत्व, मुरूम पुटकुळ्या,वजन कमी करणेवाढविणे, बालकांचेआजार,उंची,वाढविणे,कॅन्सर,एड्स मार्गदर्शन,फिट्स,लैंगिक*समस्या,वैवाहिक जीवनातील समस्या, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, त्वचाविकार ,दारू,तंबाखू सुटण्यासाठी,जुनाट,सर्दी, बुद्धी-स्मृती,एकाग्रता वाढविणे,पाठीच्या मणक्याची विकृती,संधिवात,आमवात,मुळव्याध,किडनीचे विकार,पोटाचे आजार यांवर उपचार केले जातील. संध्याकाळी सात ते दहा या वेळात ठिकाण साई समर्थ क्लीनिक संतोष नगर कात्रज पुणे गल्ली क्रमांक 3 कदम चाळ समोर. मोबाईल नं.8149117746 व 8530159501 याठिकाणी हे शिबिर आयोजित केले आहे.