जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे यांना जीवन गौरव पुरस्कार; श्री बनेश्वर सेवा मंडळ नसरापूर यांनी केला सन्मान

नसरापूर : भोर येथील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे यांना वारकरी जीवन गौरव आदर्श पत्रकारिता पुरस्कार गुरुवारी सपत्नीक देण्यात आला. भोर तालुक्यातील नसरापूर येथील श्री बनेश्वर सेवा मंडळ यांनी हा पुरस्कार दिला. ट्रॉफी, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे, नानासाहेब भिंताडे, संपतराव तनपुरे, आबा यादव, शस्त्रीजी महाराज व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

Advertisement

मुसळे यांनी भोर, वेल्हा तालुक्यात मागील ४७ वर्ष निपक्ष, पारदर्शी, विश्वासार्ह लेखणीतून सामाजिक, शैक्षणीक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विपुल लेखन केले आहे. त्यांनी दैनिक संद्या, केसरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स या मराठी वृत्त पत्रासह महाराष्ट्र हेरॉड या इंग्रजी व दैनिक भास्कर हिंदी दैनिकात काम केले आहे. सध्या ते केसरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दैनिक भास्कर मध्ये वृत्तांकन करतात. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याचे आयोजकांनी सांगितले. 

मुसळे यांचा यापूर्वी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सासवड, मावळा जवान संघटना वेल्हे, फुले प्रहार सामाजिक संस्था इंदापूर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघ पुणे, प्राथमिक आरोग्य केंद्र भोर, पदमश्री डॉ. मनिभाई देसाई प्रतिष्ठान पुणे, अभियांत्रिकी विद्यालय धांगवडी, वाघ्या मुरळी संघटना महाराष्ट्र राज्य रोटरी क्लब ऑफ भोर आदी संघटनांनी सन्मान केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page