कारी येथे शिवरत्न जिवाजी महाले यांना जयंती निमित्त अभिवादन
भोर प्रतिनिधी : तुषार सणस
भोर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भोर तालुका नाभिक संघटना,शिवरत्न जिवाजी महाले स्मारक समिती, ग्रामपंचायत कारी यांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भोर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आंबवडे येथे जिवाजी महाले यांच्या समाधीस अभिषेक व अभिवादन करण्यात आले.भोर ते कारी भव्य रॅली काढण्यात आली होती. कारी येथे कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, शिवरत्न जिवाजी महाले व सरदार कान्होजी जेधे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयंती निमित्त जन्माचा पाळणा घेण्यात आला. अनेक मान्यवरांनी जिवाजी महाले यांच्या कार्याची माहिती दिली तसेच प्रतापगडावरील पराक्रमाची गाथा ऐकवली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे, पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष सुभाष निढाळकर, प्रतापगड उत्सव समिती चे अध्यक्ष विनायक सणस, सरदार कान्होजी जेधे यांचें वंशज रणधीर जेधे, पुणे शहर उपाध्यक्ष अविनाश पवार, भोर तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत वाघ,मा.अध्यक्ष शिवाजी राऊत, दत्तात्रय वाईकर ,बाबुराव तावरे, शशिकांत पालकर, गणेश पवार, प्रकाश शिंदे,मा.नगरसेवक दिपक पालकर कारीचे सरपंच सतिश ढेबे, सदस्य पोपट घोलप,मनिषा तावरे , तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव घोलप नाभिक संघटनेचे विकास शिर्के, संतोष शिंदे, विशाल दळवी, प्रविण घोडके, संतोष उल्हाळकर,मनोज शेडगे,रवी पालकर,बाळू शिंदे, गणेश शेडगे,सागर उल्हाळकर, संजय जाधव, संतोष तावरे, महिला अध्यक्ष नंदा साळुंखे, जनाबाई पालकर, चित्रा उल्हाळकर, ज्ञानेश्वर तावरे, अंकुश तावरे, सागर यादव, गणेश पालकर ,नंदु क्षीरसागर, सर्व तावरे परिवार यांसह अनेक शिवप्रेमी,कारी ग्रामस्थ,व नाभिक समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शरद पवार यांनी केले.