कापूरहोळची गावठी हातभट्टी उधवस्थ! राजगड पोलिसांची बेधडक कारवाई.
नसरापूर :-
पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ (ता.भोर) येथील सुप्रसिद्ध गावठी हातभट्टी दारू विक्रेत्यावर राजगड पोलिसांनी बेधडक कारवाई करून मोठ्या प्रमाणातील हातभट्टी दारू व निर्मिती साठी लागणाऱ्या साहित्याची नासधूस करून उध्वस्त केल्याची कामगिरी राजगड पोलिसांनी केली.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कापूरहोळ परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू विक्रीची चर्चा गुप्तहेराकडून कळाली.. कापूरहोळ येथील साळोबावाडी येथील ओढ्यालगत विकास सुरेश रेपावत वय 26 याचा चालू असलेला हातभट्टी व्यवसायावर राजगड पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक झिंजूर्के सहाय्यक फौजदार जगदीश शिरसाट,राजेंद्र चव्हाण, योगेश राजीवडे यांनी कारवाई केली.
यादरम्यान यांना घटनास्थळावर सापडलेल्या मुद्देमालाची नासधूस करून उद्वस्थ केले. त्यावेळी त्यांनी काळया 3 हत्ती केंडा न मधील हातभट्टी दारू जप्त केली. त्याचे शासकीय मूल्यांकन 6000 रू एवढे होते. त्यावेळी हातभट्टी उत्पादक विकास रेपावत याच्यावर भा. द. वि. 65 ई अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिसांची चाहुल लागताच हातभट्टी उत्पादक विकास रेपावात याने झाडा झुडपाचा आडोसा घेऊन पलायन केले.
कापूरहोळ परिसरात हातभट्टी गावठी दारू व बेकायदेशीर विक्रेत्यांवर या कारवाई मुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण करत आहेत.