ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार तायक्वांदो स्व-संरक्षणाचे धडे…
कापूरहोळ प्रतिनिधी : मंगेश पवार
पुरंदर न्यूज : पुरंदर तालुक्यातील केतकावळे गावात तायक्वांदो या फाउंडेशन चे आयोजन करण्यात आले होते. बुधवार (दि.११) रोजी सायंकाळी सहा वाजता याचे आयोजन केले होते.श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत केतकावळे तालुका पुरंदर या ठिकाणी उद्घटन झाले. या कार्यक्रमाला गावचे सरपंच विद्याताई श्रीकांतदादा खाटपे, भूषण भडाळे, श्रीकांत खाटपे, धनंजय पांगारकर, देवीदास गोळे, मनोज खाटपे, किरण साळेकर सर,तुषार बाठे, पप्पू बाठे, जीवन भडाळे, प्रतिक पांगारकर, सागर खाटपे उपस्थित होते. गावचे सरपंच यांच्या हस्ते क्लासचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच यांनी सांगितले की खेळामुळे विद्यार्थ्यांचा विकास होऊन, सहानुभूती, शिस्त, निर्णय घेण्याची क्षमता वाढते. भविष्यासाठी तायक्वांदो फाउंडेशन मुळे मुला मुलींना स्वरक्षण करता येईल. तसेच त्याचा फायदा शालेय आणि भरतीसाठी (सरकारी नोकरी ) होईल.
(U.T.F) युनिक तायक्वांदो फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तायक्वांदो या खेळाच्या मार्फत स्वरक्षणाचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे. आज कालच्या कलियुगामध्ये स्वरक्षण ही काळाची गरज बनली आहे. या साठी गावातील 57 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच पालकांनी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी युनिक तायक्वांदो फाउंडेशनचे प्रशिक्षक, जितेंद्र भगत सर, समीर शेख सर, संकेत साळुंखे सर, निलम निकम मॅडम, सिद्धी पांगारकर मॅडम, अदिती बाठे मॅडम आदी उपस्थित होते.