महाराष्ट्रातील ऐतिहसिक आठ विहिरी झळकल्या पोस्टकार्डवर ! त्यात पुण्यातील मंचर व साताऱ्यातील बाजीराव विहिरीचाही समावेश…
महाराष्ट्र न्यूज : केंद्रीय डाक विभागाने राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त भारतातील उल्लेखनीय विहिरींचे निरीक्षण केले. त्यातील मुख्यतः बारव, बावडी, पुष्करणि, पोखरण,पायविहिर,घोडेबाव, पोखरबाव,अशा वेगवेगळ्या विहिरिंतून महाराष्ट्रातल्या आठ विहिरींच्या छाया चित्रांचा समावेश पोस्टाच्या पुस्तिकेत केला आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे यांनी सहकर्यांसह बारव संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. अनेक नामशेष आणि बुजलेल्या बरवांचा शोधही या मोहिमेतून लावण्यात आला आहे.वास्तुशास्त्र आणि जलस्त्रोतांचा वारसा सांगणाऱ्या दोन हजार बरवांच्या संवर्धनाचे काम लोकसहभागातून हाती घेऊन राज्यातील दोन हजार बारव अचूक ठिकाणे नकाशावर आणली आहेत. साताऱ्यातील जलमंदिर परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीचे छायाचित्र पोस्टकार्ड वर प्रसिद्ध झाल्याने सातारा शहराच्या दृष्टीने ही एक अभिमानास्पद बाब ठरली आहे.राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वारसा संवर्धन ग्रुप समितीच्या माध्यमातून बाजीराव विहिरीची जपणूक केली जात आहे.