भोर तालुक्यातील कासूर्डी खे.बा. येथे अज्ञात चोरट्यांकडून चोरी…जवळपास ४ लाखाचे दागिने गेले चोरीला…
भोर:कासुर्डी खे.बा.येथील सुविधा वृंदावन गृह निर्माण संस्था सात मजली इमारती मध्ये बाळासाहेब दत्तात्रय सोळाकुरे(५०)हे दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ए २१२ मध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवार (दि.१२) रोजी ते काही कामानिमित्त गेले असता रात्री काही अज्ञात चोरट्यांकडून सेफ्टीडोअरला लावलेले कुलूप व आतील लाकडी दरवाज्यास लावलेले लॅच तोडून ही चोरी करण्यात आली. चोरटयांनी घरात प्रवेश करून बेडरूमधील कपाट फोडुन कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण ३९०२७५ रु चा माल चोरी करून चोरून नेलेला आहे. त्यामध्ये मुख्यतः एक सोन्याचे नेकलस चकोर डिझाईनचे १० ग्रॅम ०२० मि. ग्रॅम वजनाचे,एक सोन्याची होलो रोप चेन १० ग्रॅम ०३८० मि.ग्रॅम वजनाचे,एक सोन्याचे वेढणी ५ ग्रॅम वजनाची,एकजी. जे. टॉप्स कलकुटी वेल ३ ग्रॅम ५५० मि.ग्रॅम असलेले, एक सोन्याचा जी लक्ष्मीहार १० ग्रॅम ६०० मि ४३० मि.ग्रॅम,एक जोड सोन्याचे लेडिज टॉप्स ४ ग्रॅम ४३० मि.ग्रॅम,एक जोड सोन्याचे जी बटन लेडीज टॉप्स ०४ ग्रॅम ४३० मि. ग्रॅम,एक सोन्याचे वेढणी 2 ग्रॅम वजनाची,एक सोन्याची जी गोल्ड वेढणी २ ग्रॅम वजनाची,एक सोन्याचे वेढणी १ ग्रॅम वजनाची,एक सोन्याचे वेढणी १ ग्रॅम वजनाची,एक सोन्याचे गंठण ३ तोळा वजनाचे,एक सोन्याचे गंठण १ तोळा वजनाचे,एक सोन्याचे पेंडल १० ग्रॅम २२ मि. ग्रॅम वजनाचे,एक सोन्याचे पेंडल १० ग्रॅम ९४ मि. ग्रॅम वजनाचे,एक चांदीची पैंजण जोड़ ३९ ग्रॅम वजनाचे आणि तेरा हजार रुपये रोख रक्कम असे एकूण १४ तोळे ७५ मि. ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागीने ज्याची किंमत ३९०२७५ रुपये आहे. तसेच चोरटयांनी आजूबाजूला असलेले तीन खाली फ्लॅट सुद्धा फोडले आहेत. आज शुक्रवार ( दि.१३) रोजी बाळासाहेब सोळाकुरे घरी आले असता त्यांच्या हे सर्व निदर्शनास आले. त्यांनी लगेच राजगड पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. पोलिस नाईक सुर्यवंशी यांनी लगेच अज्ञात चोरट्यांविरोधात भा. द. वि. ४५४,४५७,३८०,४११ कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी साहेब करीत आहेत.