सातारा जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा शिरवळ येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते उद्या ३ जानेवारी रोजी शुभारंभ

शिरवळ : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांद्वारे अत्याधुनिक सुविधा व उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हा नाविण्यपुर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राबविण्याचा मानस ठेवला आणि त्याचीच प्रचिती म्हणून सातारा जिल्ह्यातील ४९ संस्था स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ, तसेच ५२ कोटी रुपये रकमेच्या नूतन ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ई-भूमिपूजन. तसेच ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगांव नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण आणि आय केअर स्वयंसेवी संस्था बारामती यांचे मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राना १२५ संगणकांचा वाटप कार्यक्रम दिनांक ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते बुधवार, दिनांक ३ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता श्रीपतराव महाविद्यालय, शिरवळ (ता. खंडाळा जि. सातारा) येथे होणार आहे.

Advertisement

“आयुष्यमान भारत” कार्यक्रमांतर्गत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयातील एकुण ४९ प्राथमिक आरोग्य केद्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जावली तालुक्यात कुडाळ, कुसुंबी, बामणोली (कसबे). कराड तालुक्यात उंब्रज, रेठरे बुद्रुक, काले, कोळे, येवती मसूर, हेळगांव, सुपने, वडगांव हवेली. खटाव तालुक्यात डिस्कळ, पुसेसावळी, कातरखटाव, निमसोड, मायणी. माण तालुक्यात मार्डी, मलवडी, पुळकोटी,व शिंगणापूर. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा व तळदेव. खंडाळा तालुक्यातील शिरवळ, लोणंद. पाटण तालुक्यात मरळी, मोरगिरी, केरळ, मरुड, साळवे, तारळे, चाफळ, कळगाव, सोनवडे ही गावे आहेत. कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर, वाठार स्टेशन, पळशी, सातारारोड, तडवळे. सातारा तालुक्यात कुमठे, कण्हेर, नागठाणे, नांदगाव, ठोसेघर. फलटण तालुक्यातील बीबी, राजळे. वाई तालुक्यात भुईंज, बावधन, कवठे या प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी एकूण ४१ कोटी ३९ लाख १७ हजार निधीची आवश्यकता असून, त्यापैकी १९ कोटी ४३ लाख ५८ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page