जेजुरी पोलिसांच्या कौशल्यपुर्ण तपासामुळे अवघ्या काही तासात जबरी चोरी करणारी टोळी गजाआड…

जेजुरी :रविवार (दि.१५) रोजी रात्री ९ च्यादरम्यान शुभम कृष्णकुमार दुबे (वय २९ वर्षे) ही व्यक्ती जेजुरी गावचे हददीत सरस्वती लाँजचे समोर जेजुरी मंदीराकडुन सासवड रोडकडे चालत जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून एफ झेड मोटार सायकल आली. त्यावर 3 व्यक्ती स्वार होत्या.त्यातील दोन व्यक्तींनी दुबेंच्या हातामधील पिवळया रंगाची पिशवी जबदरस्तीने ओढून पिशवीमधील एकुण रक्कम २३४०० रुपये चोरून नेले आहे.या अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांची धांदल उडाली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. सदरील घटनेचा ३ अज्ञात चोरटया विरूध्द पोलीस अंमलदार सहा.पो.फौज.खामगऴ यांनी सोमवार (दि.१६) रोजी दुपारी ३ वाजता कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.सदरील घटनेचा तपास सिंघम पोलीस म्हणून सगळीकडे ओळख असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्या कडे देण्यात आला. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता घटनेचा तपास करायला सुरुवात केली. त्यांनी दुबे यांना घटनेची माहिती विचारली असता तुम्ही त्या व्यक्तींना ओळखू शकता का असे विचारले तर दुबेंनी मी त्या व्यक्तींना पाहिले आहे. मी ओळखू शकतो.असे सांगितले. मग पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहायला सुरुवात केली.सदर गुन्हयातील फिर्यादी दुबे यांनी सांगितलेल्या वर्णनावरून जेजुरी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात लक्ष्मण उर्फ गोठ्या राजेंद्र कांबळे (रा.नाझरे).तुषार लक्ष्मण मेमाने (रा.लवथळे्वशर जेजुरी) आकाश बळीराम अवघडे (रा. जुनी जेजुरी)यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात जेजुरी पोलिसांना यश आले आहे.सदर करवाई मा अपर पोलीस अधीक्षक भोईटे साहेब, मा. उप विभागीय पोलिस अधिकारी श्री बरडे साहेब व मा.पोलिस निरीक्षण सांडभोर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलिस हवालदार आरडे, पो हवा बनसोडे, पोलिस शिपाई किवळे, पोलिस शिपाई गणेश गव्हाणे, पोलिस शिपाई चितारे, पोलिस शिपाई माने यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page