चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून १५ हजार किलोपेक्षा जास्त दिवाळी फराळ वाटप

पुणे : कोथरुड मधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला असून, या उपक्रमास कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नामदार पाटील यांच्या माध्यमातून जवळपास १५ हजार किलोपेक्षा जास्त दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

कोथरुड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी; या उद्देशाने दरवर्षी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देतात. ना. पाटील यांच्या या उपक्रमामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिवाळी मध्ये मोठा आधार मिळातो. अनेकजण याचा लाभ घेत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतात.

Advertisement

यंदाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिवाळीसाठी बाणेर, कोथरुड आणि कसबा मधील नागरिकांसाठी नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला. नामदार पाटील यांच्या माध्यमातून जवळपास १५ हजार किलोपेक्षा जास्त दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात आला. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या दरवर्षीच्या या उपक्रमावर कोथरुड मधील महिलांनी समाधान व्यक्त केले असून, नामदार पाटील यांचे कार्य निरंतर सुरू रहावे, अशा शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page