हडपसर येथून अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन युनिट ५ ने तब्बल १० गुन्हे केले उघड
हडपसर : पुणे शहरातील विविध भागांमध्ये जबरी चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलास युनिट ०५, गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले असून, १० गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत युनिट ०५ ला आदेशित केलेले होते. पोलिस निरीक्षक युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिटकडील अधिकारी व पोलिस अमंलदार हे हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलींग करत होते. पोलिसांना मिळालेल्या बातमीवरुन एक अल्पवयीन बालकास ससाणेनगर, हडपसर पुणे येथून ताब्यात घेवून त्याच्याकडून एकुण १० मोबाईल फोन मिळुन आले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने व त्याचा अल्पवयीन मित्र असे दोघांनी पुणे शहरातील विविध ठिकाणाहुन ते चोरलेले असल्याचे सांगीतले. त्याचे कडुन १,४५,५०० रुपये किंमतीचे १० मोबाईल फोन व एक मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. जप्त मोबाईल फोन बाबत बऱ्याच पोलीस स्टेशन मधील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलिस उप निरीक्षक चैताली गपाट, पोलिस अमंलदार आश्रूबा मोराळे, दया शेगर, रमेश साबळे, पल्लवी मोरे, राजस शेख, प्रताप गायकवाड, पृथ्वीराज पांडुळे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्यद, अकबर शेख, अमित कांबळे, शहाजी काळे, शशिकांत नाळे, विलास खंदारे, पांडुरंग कांबळे यांनी केली आहे.