“पवार कुटुंबात कुठेही मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्पपेपरवर लिहून देतो” – उपमुख्यमंत्री अजित पवार

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क: पवार कुटुंब एकत्रित आलं की कार्यकर्त्यांना वाटतं की हे एकत्र आहेत. आपण कशाला वाईट पणा घ्यायचा. पण आपण आता पुढे गेलो आहोत. यात कोठेही मॅचफिक्सिगं नाही. आपल्यासोबत आलेल्या कोणास फसवायचे नाही, अशी आपण भूमिका घेतली, आता त्यात बदल नाही. हे मी स्टॅमपेपर ही लिहून देतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर काही कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्रित दिसले. पण कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावली म्हणजे एकत्र आलं असं होत नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

कोण कोणाला ओवळाताना फोटो येतात आणि मग दबक्या आवाजात चर्चा होतात मात्र तसं काही नाही, आपल्याला गद्दारी, मॅच फिक्सिंग करायाची नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. आपल्या मित्र पक्षाचा उमेदवार असेल तर त्यांना मदत करायची आपल्याला ते मदत करतील असंही अजित पवारांनी सांगितलं.

Advertisement

मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढवण्यावर लक्ष द्या, लोकसभा नंतर लगेच चार महिन्यात विधानसभा आहे अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. इडिया आघाडीने खर्गे यांचं नाव समोर केलं आहे, लोकांनो तुम्हीच सांगा खर ते की मोदी साहेब? असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो. वयोमाना प्रमाणे नवी पिढी पुढे येत असते. त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. मात्र काही जण ऐकायला तयार नव्हते असं अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता सुनावलं. काही जण जाणीवपूर्वक पसरवत आहेत की अजित पवार गटाचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणार, पण असं काही नाही. आमच्या सारखं लवकर उठून कामाला लागा, आमच्या सारखं एकदम पहाटे कामाला लागू नका, पहाटेची स्वप्न बघा चांगली असतात असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मित्र पक्षाविषयी बोलताना तारतम्य बाळगा…विनाकारण मित्र पक्षावर टीका करू नका. अशा कानपिचक्या अजित पवारांनी अमोल मिटकरींना दिल्यायत. मिटकरींनी संघाच्या बौद्धिक कार्यक्रमावरून टीका केली होती. त्यावर अजित पवारांनी मिटकरींचे नाव न घेता कान टोचलेयत. भाजप, शिवसेना, एनसीपी असं तिघांना एकत्र निवडणुका लढायच्या आहेत हे लक्षात ठेवा असंही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page