पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी संदीप सिंह गिल यांची नियुक्ती
पुणे : पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांची पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे पोलिस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्यानंतर काही उपायुक्त अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांची बदली होण्याची शक्यता होती.
गुरुवारी रात्री गृहविभागाने यात काही पोलीस अधिक्षक व उपायुक्त यांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान मावळते पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल यांची नियुक्ती केली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये गिल यांनी पुण्यात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती.
शहराचा हृद्य समजल्या जाणार्या मध्यभाग आणि पेठांचा परिसर असणार्या परिमंडळ एकच्या उपायुक्त पदी त्यांची नियुक्त करण्यात आली होती. गणेशोत्सव काळात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त हे अतिशय महत्वाचे पद समजले जाते. गणेशोत्सवात त्यांनी केलेले कामकाज कौतुकास्पद होते. मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात संदीप गिल यांच्या नावने देखावे लागले होते.