सांस्कृतिक पुणे ठरले महिलांसाठी असुरक्षित, मागील वर्षाच्या अहवालातून धक्कादायक माहिती

पुणे : महिलांसाठी पुणे शहर सुरक्षित राहिले नसल्याचा अहवाल हाती आला आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये पुण्याचा राज्यात चौथा क्रमांक आहे. यामुळे पुणे महिलांसाठी असुरक्षित झाल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्यात गेल्या वर्षभरात अत्याचाराचे ३९४ गुन्हे घडले आहेत. मागील तीन वर्षांमध्ये पुण्यात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात गेल्या दोन वर्षांत तीन हजारांपेक्षा अधिक गुन्हे नोंदविले गेले आहेत. यामुळे महिलांसाठी असुरक्षित शहर अशी एक नवीन ओळख पुणे शहराची होत आहे. पुणेकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

Advertisement

पुणे शहरात दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हुंड्यापायी महिलांना दिली जाणारी क्रूर वागणूक या गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षात तब्बल ३९४ बलात्काराचे गुन्हे समोर आले आहेत. याशिवाय विनयभंग आणि इतर गुन्हेही मोठ्या प्रमाणावर आहे. यासह अल्पवयीन मुलींना लग्नाचे किंवा प्रेमाचे आमिष दाखवून अत्याचार करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. पुणे शहरात या प्रकारच्या दीड हजारापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यांत झाली आहे. पुणे शहर निवृत्तनंतर राहण्यासाठी सर्वाच चांगले ठिकाण असल्याचे म्हटले जात होते. शहरात प्रदूषणाची समस्या असली तरी वातावरण चांगले होते. परंतु आता गुन्हेगारी वाढल्यामुळे सर्वांसाठी चिंतेची बाब बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page