राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत खेड शिवापूर टोल नाका येथे आरोग्य शिबिर संपन्न
खेड शिवापूर : ३५ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना अभियान २०२४ या अंतर्गत पुणे सातारा टोल रोड प्रा.लिमिटेड कंपनीच्या वतीने मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (NH-48) खेड शिवापूर टोल प्लाझा येथे बुधवारी(दि.३१ जानेवारी) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाहतुकीचे नियमन करताना तसेच कायदा आणि सुव्यवस्था ठेवताना पोलिसांसह, वाहतुक पोलिसही डोळ्यात तेल घालून पहारा ठेवत असतात. त्यामुळे त्यांना दृष्टिदोष, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. तेव्हा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुणे सातारा टोल रोड प्रा.लिमिटेड कंपनीच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी टोल कर्मचारी व व वाहन चालकांचे मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. आपले आरोग्य, रस्ते सुरक्षा,वाहतुकीचे नियम याबाबत यावेळी जनजागृती करून अपघात कमी करण्याबाबत अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अनिल वलिव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,प्रादेशिक परिवहन विभाग पुणे व सहायक पोलिस निरक्षक महामार्ग पोलिस सारोळा अस्लम खतीब यांनी ट्रॅक चालक व ऑफिस कर्मचारी सर्वांना रस्ता सुरक्षबाबत बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये सिध्दीविनायक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे डॉ. राजेंद्र डिंबळे, डॉ.अभिषेक शिंदे, डॉ.गजानन मोहिते, प्राजक्ता कांबळे, लहू माने, पवन मर्कट यांनी हेल्थ चेक्अप साठी शिबिराचे यशस्वी संयोजन केले.
यावेळी अमित भाटिया विभागीय प्रमुख, बद्रिप्रसाद शर्मा उप विभागीय प्रमुख, अनिल सिंग उप विभागीय प्रमुख खेड शिवापूर टोल प्लाझा, अभिजीत गायकवाड रूट ऑपरेशन मॅनेजर पुणे विभाग, मोहन धुमाळ टोल मॅनेजर खेड शिवापूर टोल प्लाझा, राकेश कोळी जनरल मॅनेजर, संदीप कोंडे, वैभव पाटील, योगेश अप्पा टीम लीडर, IE, अजित खताळ, ब्रिज इंजिनियर IE, अनंत कुलकर्णी ब्रिज इंजिनियर IE व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.