आमदार संग्राम थोपटेंचा भोर तालुक्यात एकाच दिवशी विकासकामांचा झंझावात दौरा
भोर : भोर तालुक्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी विकास कामांची उद्घाटने आणि भुमिपुजने करून शुक्रवार(दि. २३ फेब्रुवारी) गाजवला तो आमदार संग्राम थोपटेंनी. समाजातील अखेरच्या घटका पर्यंत त्यांची नाळ जुळलेली असल्यामुळे दिवसागणिक त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे.
शुक्रवारी सकाळ पासूनच त्यांनी विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा धडाका सुरू केला होता. प्रथमतः सकाळी त्यांनी भोर शहरातील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले. या इमारतीसाठी १५ कोटी ९९ लक्ष रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांत ऑफिस, तहसिलदार कार्यालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार विभाग, विद्युत विभाग, उपकोषागार, रजिस्टर ऑफिस यासह अनेक शासकीय कार्यालय एकाच इमारतीमध्ये होणार असल्यामुळे नागरिकांना सर्व सेवा एकच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच पार्किंग सुविधा ही उपलब्ध होणार आहे, त्यामुळे भोर तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही.
तसेच दुपारी त्यांनी ३ कोटी मंजूर केलेल्या महाड-मढेघाट-वेल्हा-नसरापूर-चेलाडी रा.मा.१०६ रस्त्याच्या कामाचे चेलाडी येथे भूमिपूजन केले. त्यानंतर आमदार थोपटेंनी नसरापूर येथे उभारण्यात आलेलेल्या राजमाता जिजाऊ अस्मिता भवन च्या कामाचे उदघाटन केले. तसेच केळवडे येथील नवीन रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कुरुंगवडी येथील कांटेवाडी-हरिजनवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाव, करुंजाईमाता मंदिर रस्ता, नाळपाणी पुरवठा योजना(मंजूर रक्कम रू.१ कोटी ५६ लक्ष), रा.मा.१०६ ते कुरुंगवडी रस्ता(१ कोटी ५३ लक्ष) इत्यादी कामांचे भूमिपूजन केले.
उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलताना आमदार संग्राम थोपटे बोलले की, “भोर तालुक्यात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.“
या कार्यक्रमासाठी भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेशदादा सोनवणे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव सुके, वेल्हा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नानासो राऊत, भोर पंचायत समितीचे मा.सभापती बाळासाहेब थोपटे, लहुनाना शेलार, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव सुके, संचालक शिवाजीराव कोंडे, अरविंद सोंडकर, मा.जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक सोमनाथ सोमानी, अमोल नलावडे, मा. जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे, मा.उपसभापती रोहन बाठे, शिवाजीराव कोंडे, अशोक आबा शेलार, अरविंद सोंडकर, भोर तालुक कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आंनदराव आंबवले, वेल्हा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, निखिल डिंबळे, वेळू गावचे मा.सरपंच माऊली पांगारे, ससेवाडीचे वि.से.सो.चेअरमन अशोक वाडकर, तसेच आबासाहेब यादव, अनिल गायवळ, भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल कोंडे, तसेच बाळासाहेब रेणुसे, आकाश वाडघरे, ग्रामविकास अधिकारी विजय कुलकर्णी, नसरापूर गावच्या सरपंच सौ.सपना ज्ञानेश्वर झोरे, उपसरपंच सुधीर वाल्हेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.रोहिणी अनिल शेटे, गणेश सुरेश दळवी, इरफान मुलाणी, सौ.अश्विनी कांबळे, सौ.उषा कदम, सा.कार्यकर्ते संतोष कदम, शंकर(तात्या)शेटे, ज्ञानेश्वर झोरे, आकाश वाडघरे, हिरामण पांगारे, संदीपकाका शिळीमकर, विजूबापू शिळीमकर, रमेश शिळीमकर, सरपंच सौ.अंजली ननावरे, उपसरपंच सचिन शिळीमकर, रामदास शिळीमकर, आबा कचरे, सुभाष ननावरे, उदय शिळीमकर, संदिप शिळीमकर, नरेश शिळीमकर, समीर राऊत, राहुल शिळीमकर, विश्वनाथ कचरे, संदिप कचरे, नवनाथ कचरे, लाला शिळीमकर, रवींद्र शिळीमकर, शेखर शिळीमकर, संजय खंडाळकर, सौ.नीलम सणस, सौ.संगीता घोरे, सौ.मीनाक्षी खंडाळकर, विजय शिळीमकर, रोहिदास चोरमले, संजय कचरे, पोपट शिळीमकर, सौ.शालनमाई शिळीमकर, सौ.इंदुमाई पासलकर, राजू शिळीमकर, धनाजी शिळीमकर आदी ग्रामस्थ, महिला वर्ग, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.