भोरमध्ये चिमुकल्यांसाठी “हरजीवन हॉस्पिटल” येथे रुग्णालय व्यवस्थापन अभ्यास दौऱ्याचे आयोजन; जिजामाता विद्यालयाच्या ५ वी आणि ६ वीच्या २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

भोर : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच बौद्धिक आणि व्यावहारीक ज्ञान मिळावे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन भोर शहरातील जिजामाता विद्यालयाच्या वतीने ५ वी आणि ६ वीच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांसाठी शहरातील सर्व सेवासुविधायुक्त हरजीवन हॉस्पिटल येथे रुग्णालय व्यवस्थापन अभ्यास दौऱ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या अभ्यास दौऱ्यामध्ये हरजीवन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.अमित शेठ यांनी विद्यार्थ्यांना स्वागत कक्ष, बाह्यरुग्ण विभाग, अंतररुग्ण विभाग, ऑपरेशन थिएटर,  अतिदक्षता विभाग, एडमिन डिपार्टमेंट, एक्स-रे विभाग, सिटीस्कॅन विभाग, डायलिसिस विभाग, सोनोग्राफी विभाग, कार्डियाक रुग्णवाहिका, मेडिकल विभाग, रक्तलघवी तपासणी विभाग, त्याचबरोबर हॉस्पिटलला इमर्जन्सी अत्यावश्यक बॅकअप देणारे जनसेट, पाणी आणि ऑक्सिजन पुरवठा याबाबत संपूर्ण कार्यप्रणाली समजावून सांगितली तर विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन प्रात्यक्षित दाखवून केले. तर सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयाच्या वतीने भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. 

Advertisement

जिजामाता विद्यालयाच्या मुख्याद्यापीका कविता वीर यांच्या संकल्पनेतून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरीष चव्हाण यांनी आरोग्य विम्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच हॉस्पिटलचे व्यवस्थापक तन्मय कुंभार यांनी उपस्थित शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

One thought on “भोरमध्ये चिमुकल्यांसाठी “हरजीवन हॉस्पिटल” येथे रुग्णालय व्यवस्थापन अभ्यास दौऱ्याचे आयोजन; जिजामाता विद्यालयाच्या ५ वी आणि ६ वीच्या २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

  • June 25, 2024 at 10:40 am
    Permalink

    आम्ही करत असेले सामाजिक कामाल नेहमी न्याय देण्याच काम आपण करत असता.
    त्याबद्दल दिपक दादा महांगरे आपले मनपुर्वक अभार

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page