आचारसंहितेच्या पहिल्या ७२ तासात खासगी मालमत्तेवरील १६ हजाराहून अधिक प्रचारसाहित्य हटविले – जिल्हाधिकारी सुहास दिवसे
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर पहिल्या ७२ तासात सर्व मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने खासगी मालमत्ता व त्यांच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तीपत्रके, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज आदी एकूण १६ हजार ३८३ प्रचारसाहित्य तात्काळ प्रभावाने हटविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
भोर विधानसभा मतदासंघात ८३९, जुन्नर ६५७, आंबेगाव ५७२, खेड आळंदी १ हजार १३३, शिरूर ६०५, दौंड ७७६, इंदापूर १ हजार ४६१, बारामती २४४, पुरंदर २ हजार १३८, मावळ ४७४, चिंचवड ३ हजार ७५५, पिंपरी ३६५, वडगाव शेरी १०६, भोसरी १ हजार ६८५, शिवाजीनगर १७८, कोथरुड १२१, खडकवासला २९२, पर्वती ३६९, हडपसर १४९, पुणे कॅन्टोन्मेंट ३७९, कसबा पेठ मतदार संघात ८५ असे फलके, होर्डिंग्ज, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज असे सार्वजनिक मालमत्तेवरील एकूण १६ हजार ३८३ प्रचारसाहित्य हटविण्यात आले आहेत.
हटविण्यात आलेल्या प्रचारसाहित्यात भिंत्तीवरील लिखान १ हजार ५४६, भित्तीपत्रके ३ हजार ७१२, जाहिरात फलके १ हजार ३१७, बॅनर्स ३ हजार ८६५, ध्वज २ हजार १४८ आणि इतर साहित्य ३ हजार ७९५ यांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी दिली आहे.