MahaDBT :- कृषी सिंचन योजने अंतर्गत मिळणार वैयक्तिक शेततळे
MahaDBT :-
मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन (Irrigation scheme) योजनामध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करत शेततळे अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत शेततळे या घटकाची महाडीबीटी प्रणालीद्वारे तालुकानिहाय लक्ष्यांक देऊन ऑनलाईन सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र जमीन असावी व जमीन शेततळे खोदण्यास योग्य असणे आवश्यक आहे. शेततळे, सामूहिक शेततळे (shettale yojna) किंवा इतर शासकीय योजनेतून अनुदानातून लाभ घेतलेले नसावे. शेत तळ्यासाठी आकारमान निहाय अनुदान मिळेल. शेत तळ्यानकरिता 14433 ते 75000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.
वैयक्तिक शेततळ्यासाठी विविध आठ प्रकारचे आकारमान दर्शवण्यात आले असले, तरी शेततळ्याचे आकारमान व होणारे खोदकाम यानुसार अनुदान देण्यात येईल. मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे घ्यावयाचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च हा लाभार्थी शेतकऱ्यांना करावा लागेल.
शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन (Irrigation scheme) योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahit.gov.in/farmer/Login या संकेत स्थळावर अर्ज करावे.